ठाणे : सर्वपित्री अमावास्येच्या (Sarvapitri Amavasya Tantra Mantra Experiment) रात्री भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य (Black Magician Aghori Act) करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा (Fake Magician Arrested) डाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील सोनगावातील भोंदू मांत्रिकाच्या घरात घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 34, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाप्रतिबंध, समुळ उच्चाटन, अधिनियम 2013 चे कलम 3(2), 3 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन भोंदू मांत्रिकासह त्याचे पाच साथीदार आणि दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक (Aghori Act on Young Girls Accused Arrested) केली आहे. काजी दाउद शेख आणि बंधू तुकाराम वाघ असे अटक भोंदू मांत्रिकाचे नाव आहे.
दार उघडले आणि दृष्य पाहून गावकरीही चक्रावले -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील सोनगावातील रशीद फकीर शेख यांच्या बंद घरात सर्वपित्री अमावास्येच्या रात्री नऊ ते साडे नऊ वाजल्याच्या सुमारास भूत आणि करणीची बाधा झालेल्यावर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य सुरू असल्याची माहिती शेजाऱ्याने गावातील पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडताच घरामधील अघोरी दृश्य पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला होता. घरातील एका खोली दोन तरुणी व भोंदू मांत्रिक आणि त्याचे साथीदार अघोरी पूजेचे साहित्य लिंबू , मिरची, गुलाल, अभीर अगरबत्ती, नारळ इत्यादी असे साहित्य ठेवून त्या तरुणीवर अघोरी कृत्य करताना घरात दिसून आले. गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने भोंदू मांत्रिक, त्याचे साथीदार आणि तरुणींना पंचनामा करून घरातील अघोरी पूजेचे साहित्य जप्त केले.