महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona in Thane : नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन! कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल विभागाच्या 50 टीम तयार, पार्ट्यांवर निर्बंध - ठाणे कोरोना लेटेस्ट न्यूज

सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याची परंपराच बनली आहे. मात्र, आधीच असलेला करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात नव्या करोना विषाणूचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने नागरिकांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घालणारा निर्ण ( Guidelines for 31st December ) घेतला आहे. 31डिसेंबर रोजी रात्री ठाण्यात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळपास 50 स्पेशल टीम फिरणार असून त्यांचे पार्ट्यांवर लक्ष असणार आहे.

Corona in Thane
ठाणे कोरोना अपडेट

By

Published : Dec 29, 2021, 7:47 AM IST

ठाणे - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाढत्या कोरोनामुळे अनेक निर्बंध सर्वठिकाणी लावण्यात आलेत. परंतु मुंबईमध्ये मात्र हे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे पार्टी करणाऱ्या कंपनीने आपला मोर्चा ठाण्यातील ग्रामीण भागाकडे वळवला आहे. जर तुम्हीही असेच काही ठरवले असेल तर जरा थांबा. कारण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळपास 50 स्पेशल टीम या गर्दी करू पाहणाऱ्या पार्ट्यांवर (New Year 31st Eve Party ) नजर ठेवणार आहेत आणि कारवाई ही करणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल विभागाच्या 50 टीम तयार
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जसे गोवा, महाबळेश्वर, माथेरानसारखी शहर सजतात. तसेच काहीसे चित्र ठाणे व मुंबई शहरातही पाहायला मिळते. बंगले बुक करा, मैदान बुक करा किव्हा मग हॉटेल्स बुक करून 31 डिसेंबरची ( Guidelines for 31st December ) रात्र एन्जॉय करायचे अनेक जण ठरवतात. परंतु असे करताना कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले आहेत. ते काटेकोर पाळा असेच प्रशासन सांगत आहे.परंतू पार्ट्या नियम धाब्यावर बसवतात आणि हे सध्याच्या घडीला टाळणे किंवा थांबवणे काळाची गरज आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांनी ही रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लावली आहे. यात 5 पेक्षा जास्त लोक रात्री एकत्र फिरू शकत नाही.

पोलिसांसहित जवळपास 50 स्पेशल टीम गर्दी करणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या टीम फिरणार असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या 50 टीम तयार केल्या आहेत. खासकरून ठाण्यातील ग्रामीण भागात गर्दी करणाऱ्या पार्ट्या होऊ शकतात. त्यामुळे अशा भागांकडे म्हणजेच पिकनिक पॉईंट व धाब्यांवर या टीम फिरकणार आहेत. नवीन वर्षात कारवाईला सामोरे जायचे नसेल, तर मग नक्कीच कोरोनाचे सर्व नियम पाळा कारण कोरोना रुग्ण हळू हळू वाढत आहे. त्यामुळे आता जास्त काळजी घ्या, असे आव्हान यावेळी ठाणे जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

हेही वाचा -Ajit Pawar Reply : राज्य कसं चालवायचं ते आम्हाला कळतं; अजित पवारांचा विरोधकांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details