महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Virar Flag Making विरारमधील ४५० महिलांचे हात गुंतले ध्वजनिर्मितीत

वसई-विरार महापालिकेच्या ( Vasai-Virar Municipal Corporation ) माध्यमातून १ लाख ५१ हजार ध्वजांची निर्मिती करण्यात येणार आहे. या ध्वजनिर्मितीचे काम पालिकेने महिला बचत गटांना ( Flag making work to women self help groups in Virar ) दिले आहे. या पैकी तब्बल ७५ हजार ध्वज, दीड लाख काठ्या आणि तितकेच धागे विरार येथील आकांक्षा शहर स्तर संघ व भरारी शहर स्तर संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या बचत गटातील ४५० महिलांचे हात मागील महिनाभर या ध्वजनिर्मितीत गुंतले ( 450 women in Virar engaged in flag making ) आहेत.

Flag making work to women self help groups in Virar
महिला बचत गटातर्फे तिरंगा निर्मिती (विरार)

By

Published : Aug 11, 2022, 10:51 PM IST

विरार : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम ( Har Ghar Tiranga Campaign in Vasai Virar ) १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत वसई-विरार महापालिकेच्या ( Vasai-Virar Municipal Corporation ) माध्यमातून १ लाख ५१ हजार ध्वजांची निर्मिती करण्यात येणार आहे. या ध्वजनिर्मितीचे काम पालिकेने महिला बचत गटांना ( Flag making work to women self help groups in Virar ) दिले आहे. या पैकी तब्बल ७५ हजार ध्वज, दीड लाख काठ्या आणि तितकेच धागे विरार येथील आकांक्षा शहर स्तर संघ व भरारी शहर स्तर संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या बचत गटातील ४५० महिलांचे हात मागील महिनाभर या ध्वजनिर्मितीत गुंतले ( 450 women in Virar engaged in flag making ) आहेत. तर १० महिला रिक्षाचालक महिलांचे योगदानही या कामाच्या वहन व्यवस्थेकरता लाभले आहे. उर्वरित ध्वज अन्य बचत गट तर मोठे २० हजार ध्वज पालिकेने थेट उत्पादकाकडून खरेदी करण्यात आले आहेत.

विरारमध्ये महिला बचत गटाकडून तिरंग्याचे प्रदर्शन


नागरिकांना मोफत ध्वज वाटप- दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरिक अभियान विभाग शहर व्यवस्थापक रुपाली कदम व नियंत्रक सुकदेव दरवेशी यांनी मंगळवारी सकाळी निर्मितीस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बचत गटांतील महिलांच्या कामाचे कौतुकही केले. दरम्यान, ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने वसई-विरार महानगरपालिकेच्या ९ प्रभाग समिती कार्यालयांमधून नागरिकांना मोफत ध्वज वाटप करण्यात येत आहे. ध्वज वाटप करण्यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या जवळच्या प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जाऊन तेथे नोंदणी करून ध्वज प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. १० ऑगस्ट २०२२ पर्यंत नागरिकांनी नोंदणी करून झेंडा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विरारमध्ये महिला बचत गटाकडून ध्यजनिर्मितीचे कार्य


ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन - यासाठी प्रभाग समिती कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी ध्वजसंहितेचे पालन करून १३ ऑगस्ट २०२२ रोजी झेंडा सन्मानाने लावावा व उपक्रम कालावधी संपल्यानंतर म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी सन्मानाने उतरवून ठेवावा. त्यानंतर नागरिकांनी ज्या प्रभाग समिती कार्यालयातून झेंडा प्राप्त केला आहे; त्याच ठिकाणी झेंडा परत करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

हेही वाचा -Independence Day 2022 स्वातंत्र्याशी संबंधित देशातील 4 ऐतिहासिक स्मारक

ABOUT THE AUTHOR

...view details