ठाणे - एका सराईत तस्कराला ४ लाखांच्या गांजासह सापळा रचून महात्मा फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. रहमत युसुफ पठाण (वय, ३१ ) असे गांजा तस्कराचे नाव असून त्याच्याकडून २७ किलो ४०५ ग्रॅम वजनाचा ४ लाख ५ हजार किंमतीचा गांजा (अमलीपदार्थ) हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तस्करावर खुनाचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा
रहमत युसुफ पठाण हा कल्याण पश्चिम परिसरातील वल्लीपीर पोलीस चौकीच्या समोर, एका चाळीत राहतो. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात त्याच्यावर भा.दं.वि.कलम ३०७, १२०(ब) प्रमाणे दाखल गुन्हा करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासादरम्यान गुप्तबातमीदाराकडुन रहमत घरी आला असल्याची माहीती मिळाली. पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे, प्रकाश पाटील व इतर पोलीस पथकाने आरोपी राहत असलेल्या परीसरात घेराव घातला व आरोपीला ताब्यात घेतले.
तस्कराच्या घरातून गांजाचा साठा जप्त