ठाणे - गुरुवारी ठाण्यात तब्बल 395 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन हवालदिल झाले आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. रविवारी ठाण्यात 341 रुग्ण, सोमवारी 338 रुग्ण, मंगळवारी 266 रुग्ण तर बुधवारी 363 रुग्ण आढळले होते.
ठाण्यात गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधिक 395 कोरोनाग्रस्तांची नोद - ठाणे न्यूज
गुरुवारी ठाण्यात तब्बल 395 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन हवालदिल झाले आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
ठाण्यात गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधीक 395 कोरोनाग्रस्तांची नोद
कोरोना रुग्णांच्या वजाबाकीसोबतच बेरीज आणि गुणाकार झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यात सध्याच्या स्थितीत 4 हजार 881 रुग्णांनी कोरोनवर मात करून घरी गेले आहेत. तर प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 हजार 316 एवढी आहे. तर घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 53 टक्के आहे. तर गुरुवारी मृतांच्या आकड्यात घट झालेली आहे. गुरुवारी 11 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत मृत पावलेल्या रुग्णांचा आकडा 333 वर गेला आहे.