ठाणे - शिवाई नगर परिसरात असलेल्या वारीमाता ज्वेलर्सवर रविवारी पहाटे २ ते २-३० वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. या दरोड्यात दुकानातील ३ किलो सोने चोरीला गेले आहे. या दरोड्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात आरोपीच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
शिवाई नगरमध्ये वारीमाता गोल्ड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या गळ्यात फळविक्रीचा धंदा गेल्या दोन महिन्यापासून सुरु होता. सदर फळे विकण्यासाठी महिना २८ हजार रुपये भाड्याने गाळा एका परराज्यातील इसमाने घेतला. अधिक भाडे मिळत असल्याच्या लालचेने दुकान मालक पाटील यांनी कुठलीही चौकशी न करता दुकान भाड्याने दिले. दुकान भाड्याने घेतल्यानंतर या दुकानात दोन महिने फळे विक्रीचा व्यवसाय केवळ नावापुरता सुरु केला आणि संधी मिळताच रविवारी पहाटे २ ते २-३० वाजण्याच्या सुमारास फळाचे दुकान आणि ज्वेलर्सच्या दुकानात असलेली सामाईक भिंत फोडून आरोपीने दुकानात प्रवेश केला.
ठाणे : वारीमाता ज्वेलर्स दुकानावर धाडसी दरोडा, ३ किलो सोने चोरीला - ठाण्यात ३ किलो सोने पळवले न्यूज
शिवाई नगर परिसरात असलेल्या वारीमाता ज्वेलर्सवर रविवारी पहाटे २ ते २-३० वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. या दरोड्यात दुकानातील ३ किलो सोने चोरीला गेले आहे.
दुकानात प्रवेश केलेल्या आरोपीने दुकानातील तिजोरीची गॅस कटरने कापल्याचे आणि तिजोरीत सानी दुकानातील ३ किलो सोने घेऊन पोबारा केला आहे. वारीमाता गोल्ड ज्वेलर्सचा दरोडा हा पूर्वनियोजित दरोडा होता, हे स्पष्ट होत आहे. घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांनी पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे घेतले आहेत.
रेकी करून दुकान घेतले भाड्याने-दरोडेखोरांनी वापरली युक्ती
वारीमाता गोल्ड ज्वेलर्सवरील दरोडा हा पूर्वनियोजित दरोडा असल्याचे पोलीस तपास आणि परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. आरोपीने ज्वेलर्स आणि बाजूच्या दुकानाला सामाईक भिंत असल्याचे पाहून युक्ती लावीत हे दुकान भाड्याने घेतले. दोन महिने या दुकानात फळे विकण्याची नौटंकी केली आणि संधी मिळताच सामाईक भिंतीला भगदाड पडून दुकानात प्रवेश करून दुकानाची तिजोरी ही गॅसकटरने कापून त्यातील आणि दुकानातील दागिने असे ३ किलो सोन्याचे दागिने घेऊन आरोपीने पलायन केले. आता वर्तकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा -‘चांगला रस्ता शोधून दाखवा’ स्पर्धेचे आयोजन करा; आव्हाड यांचा शिवसेनेला टोला
हेही वाचा -चोरीचे वाहने कुर्ल्यातील स्क्रॅप मार्केटमध्ये विकणाऱ्यांचे फुटले बिंग