ठाणे : फिल्मी स्टाईलने सापळा रचून गांजा तस्करांच्या कारमधून विक्रीसाठी आणलेलातब्बल २७२ किलो गांजासह ( 272 kg of cannabis seized ) दोन तस्करांना ( Two smugglers arrested ) मानपाडा पोलिसांनी ( Dombivli Manpada Police ) बेड्या ठोकल्या आहेत. फैसल फारूख ठाकूर (वय २१ वर्षे रा. माझगाव, मुंबई ) मोहम्मद आतीफ हाफीज उल्ला अन्सारी (वय-३२ वर्षे रा. गैबीनगर, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत.
मोकळ्या मैदानात कारमधून गांजा विक्री :डोंबिवलीच्या मानपाडा हद्दीत अवैध गांजा (अमली पदार्थांची) विक्री होत असल्याची माहिती मानपाडा पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल भिसे हे पोलीस पथकासह १ जुलै रोजी डोंबिवली पूर्वेकडील उंबार्ली गावाच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या मैदानात गांजा विक्रीसाठी दोन तस्कर कारने येणार असल्याने पथकाने फिल्मी स्टाईलने सापळा रचला होता.
पोलीसांना आला संशय : त्यावेळी एका मोकळ्या मैदानात एक इन्होव्हा कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस पथकाने कारमध्ये असलेल्या इसमाची तसेच इन्होव्हा कारची तपासणी केली असता, त्यात २७२ किलोग्राम वजनाचा गांजा वेगवेगळ्या प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये मिळून आला. हा गांजा येथूनच विविध भागांत विक्रीसाठी जात होता.