ठाणे गेल्याच आठवड्यात कोनगाव पोलिसांनी ७५ लाखांचा गुटखा हरियाणामधून आलेल्या एका कंटेनरमधून जप्त करून एकाला अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच कर्नाटक राज्यातून एका कंटेनरमधून कल्याणात आलेल्या २५ लाखांच्या गुटख्यासह 25 lakh gutkha stock seized पोलिसांनी कंटेनर जप्त police seized gutkha container in kalyan केला. या साठ्यासह तीन गुटखा तस्करांना बेड्या ठोकल्या Gutkha smuggler arrest in Thane आहे. मशाक मेहबुबसाब इनामदार वय ३५ वर्षे जिल्हा गुलबर्गा, लव शामसुंदर सहाणी वय २७ वर्षे रा. उल्हासनगर, प्रेमानंद दिनेश कोठारे वय २८ वर्षे रा. उल्हासनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर रजनीकांत मोहन गायकवाड वय २८ वर्षे उल्हासनगर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
गुटख्याच्या वाहतुकीची मिळाली गुप्त माहितीपोलिसांनी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त कार्यलयातील विशेष तपास पथकातील संजय पाटील, ऋषिकेश भालेराव यांना आज रविवारी पहाटेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, कल्याण पडघामार्गे एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला फोर के स्टार गुटखा घाऊक पध्दतीने विक्रीसाठी वाहून नेला जात आहे. या माहितीच्या आधारे खडकापाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना पोलीस उपआयुक्त गुंजाळ यांनी आदेशित करुन गांधारी पुलाजवळ भंडारी चौकात कंटेनर अडविण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. Food and Drug Administration Department's action against Gutkha smugglers