ठाणे - ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात एकूण ३५ पोलीस ठाणे असून यामध्ये ५ पोलीस परिमंडळ आहेत. पोलिसांनी शहरी भागातील चेन स्नॅचिंगचे गुन्हे कमी करण्यात यश मिळविले असून यावर्षी नोव्हेंबरपर्यंत गुन्ह्याचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाले आहे. विशेषतः लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसात चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र अनलॉक काळात विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे कमी -
गेल्या वर्षी म्हणजे २०१९ जानेवारी ते नोव्हेंबर या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या शहरी भागात चेन स्नॅचिंगचे १७५ गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे या गुन्ह्यापैकी ९९ गुन्ह्याचा शोध लावल्याने या घटनेतील ५७ टक्के गुन्हे उघडकीस केल्याचा दावा स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या वर्षपासून विविध पथके तयार करून पोलिसांची गस्त वाढविल्याने गुन्हे कमी झाली आहेत. मात्र यावर्षी आतापर्यंतच्या काळात ११० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापौकी ३६ टक्के गुन्ह्यांचा शोध लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे कमी झाले आहेत. विशेषतः लॉकडाउन कालावधीत पोलिसांच्या २४ तासांच्या बंदोबस्तामुळे इतरही गुन्ह्यात घट झाल्याचे दिसून आले आहे.
परिमंडळ तीन पोलिस उपायुक्त विवेक पानसरे म्हणाले की, चेन स्नॅचिंगच्या गुन्हें कमी झाले असून अशा चोरट्यांचा शोधण्याचे प्रमाणही वाढविण्याच्या प्रयत्नांचा परिणाम झाला आहे. आम्ही चेन स्नॅचिंग प्रकरणात गुंतलेल्या बहुतांश आरोपींना जेरबंद केले आहेत. तसेच त्यांच्याकडून दागदागिने जप्त करून अशा दागिन्यांची नोंद करून त्या-त्या नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ठाणे, ग्रामीण ठाणे भागातील आमच्या पोलीस चौक्यांना बळकटी दिली. काही बाबींचा अभ्यास केल्यानंतर आम्ही चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी नाकाबंदी व गस्त घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे काही गुन्ह्यातील आरोपींना सापळा रचून अटक केली आहे. तर महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बनकर म्हणाले, कि आम्ही बाईक चेन स्नॅचर्सना पकडण्यासाठी सर्व पोलीस चौक्यांवर तपासणी ठेवली असून यामध्ये पहाटे, दुपारी आणि संध्याकाळी उशिरा काही संशयित चोरटे पायी चालणाऱ्या नागरिकांचा लक्ष्य केल्याचे आढळून आले. त्यामुळे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी निर्जनस्थळ असलेल्या रस्त्यावरही पोलिसांची गस्त वाढवली आहे.
सर्वात मोठ्या चेन स्नॅचिंगच्या टोळीतील ४२ गुन्हेगार जेरबंद -