महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सावधान! बॉडिबिल्डिंगसाठी स्टिरॉईड्स घेणे पडले महागात, ठाण्यात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेक तरुण आजकाल स्टिरॉईडचे सेवन करतात. पण असे करणे ठाण्यातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाला आहे.

bodybuilder dies due taking steroids in thane
स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने युवकाचा मृत्यू

By

Published : Jan 30, 2020, 9:05 PM IST

ठाणे - बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाला आहे. नावेद जमील खान (23) असे या तरुणाचे नाव आहे. ते मुंब्रा येथे वास्तव्यास होता. नावेद हा ठाणे शहरातील शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होणार होता.

ठाण्यात बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने मृत्यू

हेही वाचा... भारतात 'कोरोना'चा पहिला रुग्ण; केरळच्या विद्यार्थ्याला संसर्ग झाल्याचे निष्पन्न..

नावेद जमील खान (23) हा कौसा येथील चंदननगर परिसरातील अशरफ कंपाऊंडमध्ये राहतो. 26 जानेवारीला त्यांचे स्टिरॉईडच्या अतिसेवनाने निधन झाले. नावेद हा नियमित जिममध्ये जात असे. 26 जानेवारीला तो बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सहभाग घेणार होता. जिथे त्याला जिंकण्यावर प्रशिक्षक होण्याचे वचन देण्यात आले होते. ज्यामुळे नावेद जिम व्यतिरिक्त शरीर तयार करण्यासाठी पूरक आणि स्टिरॉइड्स वापरत असे.

हेही वाचा.... 'नरेंद्र मोदी आणि गोडसेची विचारधारा सारखीच, मात्र मोदींमध्ये हे मान्य करण्याचे धाडस नाही'

नावेदच्या मृत्यूनंतर त्याच्या वैद्यकीय अहवालात आणि प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्टपणे सांगितले गेले आहे. की, स्टिरॉइड्सचे अतिप्रमाणात सेवन केल्याने त्याची प्रकृती खालावली आणि त्याचे यकृत कार्य करण्याचे बंद झाले. त्याला प्रथम कौसाच्या बिलाल या रुग्णालयात दाखल केले. जेथे तीन दिवस उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला केईएम रुग्णालयात पाठवले. पण तिथेही डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर काहीही होऊ शकले नाही. केईएम येथून घरी परत येत असताना रुग्णवाहिकेत त्याचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details