महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2019, 10:11 PM IST

Updated : Nov 19, 2019, 10:35 PM IST

ETV Bharat / city

महागाईचा फटका चोरट्यांनाही; 60 किलो कांदा चोरणारे दोन चोर अटकेत

कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असून त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. या महागाईने होरपळलेल्या चोरट्यांनीही आता किमती वस्तूंऐवजी ठाणे भाजी मार्केटमध्ये कांदे-बटाट्यांच्या चोरीवरही भर दिल्याचे निदर्शनास आले आहे.

कांदे बटाटे चोरी

ठाणे- महागाईचा फटका एकीकडे सर्वसामान्यांना बसत असताना दुसरीकडे कांद्याचे भावदेखील वाढले आहेत. अवकाळी पावसाचा परिणाम भाज्यांना देखील बसला आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असून त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. या महागाईने होरपळलेल्या चोरट्यांनीही आता किमती वस्तूंऐवजी ठाणे भाजी मार्केटमध्ये कांदे-बटाट्यांच्या चोरीवरही भर दिल्याचे निदर्शनास आले आहे. .

60 किलो कांदा चोरणारे दोन चोर अटकेत

हेही वाचा -ठाणे: घराचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो ग्राहकांची फसवणूक; कोट्यवधींचा गंडा घालून बिल्डर चौकडी फरार

याबाबत ठाणे नगर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी नोंदवल्या जात होत्या. त्यानुसार, पोलिसांनी गस्त वाढवल्याने त्यांच्या सापळ्यात कांद्याची ६० किलो वजनाची गोणी चोरून नेणारे चोर हाती लागले आहेत. ते दोघेही भुरटे चोरटे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

आतापर्यंत घरफोडी व इतर चोऱ्या करताना चोरटे बघितले असतीलच. ठाणे शहरात घडणाऱ्या मोबाईल, सोनसाखळी आणि पाकीटमारी यासारख्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात केली जात आहे. त्यातच नागरिकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा आणि त्याचा जोडीदार असलेला बटाटा या दोन्हींची काही किलोमध्ये चोरी होत असल्याने ठाणे भाजी मार्केटमधील विक्रेत्यांना समजले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी येण्यास सुरुवात झाली होती. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढू लागल्याने पोलिसांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मागील दोन ते तीन दिवसांपासून चोरट्यांवर वॉच ठेवला.

हेही वाचा -धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

त्यानुसार, ठाणे भाजी मार्केटमधून कांद्याची ६० किलो वजनाची गोणी चोरून नेणाऱया कळव्याच्या महात्मा फुलेनगर येथील अविनाश कदम आणि अशोक पवार हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. चोरी झालेल्या गोणीची बाजारभावाप्रमाणे चार हजार ८०० रुपये इतकी किंमत आहे. ते दोघे भुरटे चोर असून ते चोरलेल्या कांद्याची विक्री करून येणा या पैशांचा वापर नशेसाठी करणार होते. .

या पकडलेल्या चोरांमुळे कांदा -बटाटा चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांकडून वर्तवला जात आहे. तसेच त्या दोघांना न्यायालयात हजर केले असून त्या दोघांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Last Updated : Nov 19, 2019, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details