ठाणे - एक वर्षापूर्वी हत्येच्या प्रयत्नात वापरलेले पिस्तूल ७ माऊजर पिस्टल, २ मॅगेझीन आणि २० जिवंत काडतुससह आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकाला यश आले आहे. आरोपीला १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कैलाससिंग महेंद्रसिंग चावला असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी कैलाससिंग महेंद्रसिंग चावला (२७, रा. मु.पो. गांधवानी, जि -थार, राज्य-मध्यप्रदेश) हा गावठी पिस्तूल विक्रीसाठी आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळाली होती. पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी चावला याला साकेत रोड ठाणे येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात सात माऊजर पिस्टल, २ मॅगेझीनसह २० जिवंत काडतुसे असल्याचे समोर आले. त्याची बाजारात १ लाख ८८ हजार ७५० रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे गुन्हे शाखेचे यश; सात पिस्तूल, २ मॅगेझीनसह २० जिवंत काडतुसे आरोपीकडून हस्तगत - Thane crime unit 1
आरोपी कैलाससिंग महेंद्रसिंग चावला (२७, रा. मु.पो. गांधवानी, जि -थार, राज्य-मध्यप्रदेश) हा गावठी पिस्टल विक्रीसाठी आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळाली होती. पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी चावला याला साकेत रोड ठाणे येथे ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेने अटक आरोपीच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात न्हा दाखल केला. त्याला न्यायालयात नेले असता १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक चौकशी केली असता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला हवा असलेला फरारी आरोपी असल्याचे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला समजले. या प्रकरणी पोलीस पथक अधिक चौकशी करीत आहेत.
हेही वाचा-महागाईत आणखी भडका: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयाने वाढ
सर्वात जास्त गुन्हे आणले उघडकीस
ठाणे गुन्हे शाखेने आतापर्यंत अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात ड्रग्ज केस, सिडीआर केस, पेट्रोल पंप घोटाळा आणि शेकडो हत्येचे जुने गुन्हे याच युनिट 1 ने उघडीस आणले आहेत. त्यामुळे ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठा नावलौकिक मिळविला आहे. राबोडी येथील मनसे पदाधिकारी जमील शेख याच्या हत्येचा पहिला आरोपी देखील याच टीमने पकडला आहे. या गुन्ह्यामधील आरोपींच्या शोधात युनिट 1 ची टीम मागील दीड महिन्यापासून गोरखपूर येथे ठाण मांडून बसली आहे.