मीरा भाईंदर(ठाणे)-मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने वाढ होत आहे. महापालिका क्षेत्रात शनिवारी १८२ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या देखील वाढत आहे.तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या देखील समाधानकारक आहे.
मीरा भाईंदर शहरात शनिवारी १८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.या सर्व जणांचा कोविड १९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.तर तीव्र लक्षणे असलेल्यांची संख्या कमी आहे.मीरा भाईंदरमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ हजार ४२२ झाली आहे.