ठाणे - सख्ख्या भावाच्या अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन बहिणीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हासनगर शहराच्या पश्चिम भागात घडली असून मृत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या मुलावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली.
धक्कादायक! सख्ख्या भावाकडूनच अत्याचार, अल्पवयीन बहिणीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू - ठाणे गुन्हे वार्ता
भावाच्या अत्याचारांतून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन बहिणीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली आहे.
मृत १५ वर्षांची पीडित मुलगी आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होती. तिचा लहान भाऊ आजीकडे राहतो. एप्रिल महिन्यात मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता सोनोग्राफीमध्ये पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजले. त्यांनी मुलीला विश्वासात घेतले असता, लहान भावाने अत्याचार केल्याची माहिती तिने दिली; परंतु कुटुंबाची मानहानी होईल, या भीतीपोटी त्यांनी पोलिसांत तक्रार न करता स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरू ठेवले होते. २९ सप्टेंबर रोजी स्थानिक दवाखान्यात तिने बाळाला जन्म दिला. मात्र, नाळ अडकल्याने तिला उपचारासाठी उल्हानसागरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडितेची प्रक्रृती अधिकच खलावल्याने तिला १ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; परंतु २ ऑक्टोबर रोजी पीडितेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृत पीडित मुलीच्या आईने ६ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.