महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

GST scam exposed : भिवंडीत १३२ कोटींचा जीएसटी घोटाळा उघडकीस; एकाला अटक - भिवंडीत १३२ कोटींचा जीएसटी घोटाळा

राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाने ( State goods and services tax department )मोठी कारवाई करत बोगस विक्री बिलांच्या कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा भिवंडीत उघडकीस ( GST scam exposed in Bhiwandi ) आल्याने शहरातील बड्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बनावट कंपन्यांच्या नावे जीएसटी सुरू करून १३२ कोटी रुपयांचे इनव्हॉइस जारी ( 132 crore invoice issued ) केले. त्यानंतर त्याच आधारे २३ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट ( Input Tax Credit) मिळवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी केंद्रीय जीएसटी विभागाच्या भिवंडी आयुक्त यांच्या कार्यालयाने कारवाई करून अटक केली आहे. हसमुख पटेल असे अटक आरोपीचे नाव आहे.

GST scam exposed
जीएसटी घोटाळा उघडकीस

By

Published : Sep 11, 2022, 3:55 PM IST

ठाणे : राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाने ( State goods and services tax department ) मोठी कारवाई करत बोगस विक्री बिलांच्या कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा भिवंडीत उघडकीस ( GST scam exposed in Bhiwandi ) आल्याने शहरातील बड्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बनावट कंपन्यांच्या नावे जीएसटी सुरू करून १३२ कोटी रुपयांचे इनव्हॉइस जारी ( 132 crore invoice issued ) केले. त्यानंतर त्याच आधारे २३ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट ( Input Tax Credit) मिळवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी केंद्रीय जीएसटी विभागाच्या भिवंडी आयुक्त यांच्या कार्यालयाने कारवाई करून अटक केली आहे. हसमुख पटेल असे अटक आरोपीचे नाव आहे.

या कलमांतर्गत केले अटक : तपासा दरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे, उपरोक्त आरोपी मास्टरमाइंडला CGST कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 9 सप्टेंबर 2022 रोजी CGST कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली.

२३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी..बनावट कंपन्यांच्या आडून कोणत्याही वस्तूंची प्रत्यक्ष विक्री अथवा सेवा न पुरविता अधिक किमतीची विक्री बिले विविध कंपन्यांना वितरित केल्याची माहिती केंद्रीय जीएसटी भिवंडी कार्यालयाला मिळाली होती. विशेष म्हणजे केंद्रीय जीएसटी चोरीला आळा घालणाऱ्या प्रतिबंधक शाखेकडून विविध बनावट कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू असताना त्यामध्ये या सर्वांचा मुख्य सूत्रधार हसमुख पटेल असल्याचे समोर आले आहे. या रॅकेटचा मुख्य आरोपी हसमुख पटेल असून त्याला ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. हसमुख पटेल यांना न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवाल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाच्या भिवंडी आयुक्त यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details