महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kite Flying Boy Death Thane: पतंग उडविताना पाणीपुरवठा करणाऱ्या उघड्या व्हॉल्व चेंबरमध्ये पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू - Kite Flying Boy Death Thane

पतंग उडविताना Kite Flying Boy Death Bhiwandi मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उघड्या व्हाल चेंबरमध्ये पडून boy died falling into water valve chamber 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे, ही घटना भिवंडी तालुक्यातील पोगाव हद्दीत घडली आहे, जाहिद मन्सूरी १३ वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. Kite Flying Boy Death Thane

पतंग उडविताना मुलाचा मृत्यू
पतंग उडविताना मुलाचा मृत्यू

By

Published : Sep 29, 2022, 8:20 PM IST

ठाणे :पतंग उडविताना Kite Flying Boy Death Bhiwandi मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उघड्या व्हाल चेंबरमध्ये पडून boy died falling into water valve chamber 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे, ही घटना भिवंडी तालुक्यातील पोगाव हद्दीत घडली आहे, जाहिद मन्सूरी १३ वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. Kite Flying Boy Death Thane

शरीराचा तोल गेल्याने मृत्यू -मृतक जाहिद भिवंडी तालुक्यातील पोगाव हद्दीत कुटूंबासह राहत होता. जाहिद आज दुपारच्या सुमारास पोगाव हद्दीतुन जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या मोठ्या पाईपलाईन नजीक पतंग उडवत होता. पतंग उडविताना अचानक त्याचा तोल जाऊन तो पाइपलाईच्या उघड्या व्हाल चेंबरच्या आता जाऊन पडला. यावेळी चेंबरमध्ये पाणी साचलेले असल्याने या पाण्यात बुडला.

पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा-दरम्यान घटना घडताच परिसरात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला बेशुद्ध अवस्थेत भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरने तपासणी करून त्याला मृत्यू घोषित केले आहे. या घटनेची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसकीकडे मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचा नातेवाईकांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details