महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवी मुंबईत आढळले 114 कोरोनाचे नवे रुग्ण, 90 जण बरे होऊन परतले घरी - Navi Mumbai Coronavirus information

नवी मुंबईमध्ये 11561 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 8679 जण निगेटिव्ह आले असून, 762 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई महापालिका

By

Published : May 30, 2020, 10:18 PM IST

नवी मुंबई-शहरात कोरोनाचा कहर वाढतच आहे. काल (शुक्रवारी) चक्क 277 जण नवी मुंबईत कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. मात्र, आज 114 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर आजच 90 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली, असे चित्र नवी मुंबई शहरात दिसून आले आहे. मात्र, वाढते रुग्ण रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत 2121 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते.

आत्तापर्यंत नवी मुंबईमध्ये 11561 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 8679 जण निगेटिव्ह आले असून, 762 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2110 इतकी आहे, आज 114 जण आज (29 मे) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तुर्भे 41, बेलापूर15, कोपरखैरणे15, नेरुळ 22 व वाशीतील 14, घणसोली 4, ऐरोली 2, दिघा1, असे एकूण 115 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 29 स्त्रिया व 85 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात 2110 इतका कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 1248 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत, तर आज नेरूळ 5 , बेलापूर 2, वाशी 11, तुर्भे 28, कोपरखैरणे 16, घणसोली 5, ऐरोली 16 व दिघ्यात 7 अशा एकूण 90 व्यक्ती आज कोरोना मुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन घरी परतले आहेत. यामध्ये 31 स्त्रिया आणि 59 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये 792 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 70 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details