महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक..! उल्हासनगरमधील 'त्या' रुग्णालयातील डॉक्टरसह ११ कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह - news about corona

उल्हासनगर शहरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आढळला होता. त्यामुळे संबंधित डॉक्टरांसह 11 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, संबंधित डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

11-employees-including-doctors-from-shivneri-hospital-in-ulhasnagar-corona-report-negative
दिलासादायक ! उल्हासनगरमधील 'त्या' रुग्णालयातील डॉक्टरसह ११ कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

By

Published : Apr 14, 2020, 9:49 PM IST

ठाणे -उल्हासनगरातील एका खासगी रुग्णालयात दिवा (ठाणे) येथे राहणारा रुग्ण उपचारासाठी आला होता. हा रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आढळल्याने या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह ११ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, आज या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ही उल्हासनगर वासियांसाठी दिलासादायक बातमी ठरली आहे.

दिलासादायक ! उल्हासनगरमधील 'त्या' रुग्णालयातील डॉक्टरसह ११ कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

दिवा येथून एक रुग्ण उपचारासाठी उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयात 3 एप्रिलला आला होता. या रुग्णाचे एक्सरे रिपोर्ट चेक केले असता येथील डॉक्टरानी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांनतर या रुग्णाला ठाण्यातील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. १० एप्रिलला हा रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे समोर आले होते. यानंतर उल्हासनगर पालिका प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेच शिवनेरी रुग्णालय सील करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे या रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर्स व इतर कर्मचारी, यांची यादी देण्याचे आदेश शिवनेरी रुग्णालयाला देऊन आरोग्य विभागातर्फे शिवनेरी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची हाय रिस्क आणि लो रिस्क अशी वर्गवारी करून त्यांचे नमुने मध्यवर्ती रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. यानंतर सर्वाना क्वारंटाइन ( अलगिकरण ) करण्यात आले होते. मात्र, आज या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने उल्हासनगर वासियांसाठी दिलासादायक बातमी आल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.

उल्हासनगर शहरात यापूर्वी एकच रुग्ण आढळून आला होता. मात्र, त्या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कोरोना बाधित रुग्ण नव्हता. आता मात्र शिवनेरी या खासगी रुग्णालयात दिवा परिसरात राहणार एक रुग्ण उपचासासाठी आला असता, तो कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे हे खासगी रुग्णालय सील करण्यात आले होते. शिवनेरी या खासगी रुग्णायातील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे उल्हासनगरमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने शहर वासीयांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details