महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

109 passengers missing in KDMC : धक्कादायक! विदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेले १०९ प्रवासी बेपत्ता - 109 passengers go missing

गेल्या १० दिवसांत विदेशातून कल्याण डोंबिवलीत ( KDMC ) आलेल्या २९५ नागरिकांपैकी ८८ जणांची कोवीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ४८ जणांचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहेत. यातील ३८ नागरिक हे महापालिका हद्दीतील बाहेरचे रहिवासी आहेत. तर १०९ जणांशी संपर्क ( 109 passengers go missing in Kalyan Dombivali ) साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन ( KDMC administration ) सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

केडीएमसीचे आयुक्त
केडीएमसीचे आयुक्त

By

Published : Dec 6, 2021, 7:38 PM IST

ठाणे - कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ( KDMC ) यंत्रणेने खबरदारी आणि उपाययोजनांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत विदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या २९५ नागरिकांपैकी १०९ प्रवाशांचा ( 109 passengers go missing in Kalyan Dombivali ) शोध घेतला सुरू असल्याची माहिती केडीएमसीचे आयुक्त ( KDMC commissioner Vijay Suryawanshi on Omicron ) डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या १० दिवसांत विदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या २९५ नागरिकांपैकी ८८ जणांची कोवीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ४८ जणांचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहेत. यातील ३८ नागरिक हे महापालिका हद्दीतील बाहेरचे रहिवासी आहेत. तर १०९ जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेकांचे फोन बंद येत आहेत. तर अनेकांच्या घराला कुलूप असल्याने संपर्कात अडथळा येत असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. या १०९ प्रवाशांचे मोबाईल नॉटरिचेबल ( 109 passengers go missing in KDMC ) असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढल्याचे दिसून आले आहे.

१०९ जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

हेही वाचा-Omicron Variant - ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग प्रचंड, काळजी घेण्याची गरज - आरोग्यमंत्री



७ दिवसांचे गृह विलगीकरण बंधनकारक
विदेशातून कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. लो रिस्क (कमी धोक्याचे देश) आणि हाय रिस्क (अति धोक्याचे देश) देशातून येणाऱ्या व्यक्तींना ७ दिवसाचे गृह विलगीकरण बंधनकारक आहे. या ७ दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच 8 व्या दिवशी त्यांची कोवीड टेस्ट होणार आहे. त्यात निगेटिव्ह आले तरीही परत ७ दिवसांचे गृह विलगीकरण आणि पॉझिटिव्ह आल्यास केडीएमसीच्या संस्थात्मक विलगीकरण केले जाईल. तर ज्या सोसायटीमध्ये अशा व्यक्ती राहत असतील त्या नियमानुसार गृह विलगीकरण करतात की नाही याची खबरदारी सोसायटीने ( KDMC rules for home quarantine ) घेण्याचे निर्देश दिले आहेत. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे.

हेही वाचा-Rajesh Tope On Genome Sequence Lab : राज्यात आणखी दोन जिनोम सिक्वेन्ससिंग लॅब सुरू करणार - राजेश टोपे



मास्क न घालणाऱ्यांविरोधात उद्यापासून पुन्हा कडक कारवाई
गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा व्यक्तींविरोधात उद्यापासून पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहितीही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. याशिवाय लग्न समारंभ , मोठे कार्यक्रमांमध्ये सरकारने दिलेल्या नियमांचे पालन नजर असेल असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा-BMC to control Omicron spread : ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याकरिता मुंबई महापालिकेकडून 'या' उपाययोजना सुरू

कोवीड लस घेण्याचे आवाहन…
कोरोनाला अटकाव घालण्यात कोवीड लस हा महत्त्वाचा घटक आहे. लस न घेतलेल्या नागरिकांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. कल्याण डोंबिवलीमध्य आतापर्यंत ७२ टक्के नागरिकांचा पहिला आणि ५२ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details