महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

श्रावणात दर सोमवारी शंकराचे पूजन केल्यास इच्छा पूर्ण होते - पंचांगकर्ते मोहन दाते - Siddheshwar Temple Solapur

हिंदू पंचांगातील श्रावण हा पाचवा महिना आहे. निसर्गरम्य वातावरणासाठी देखील श्रावण महिन्याला ओळखले जाते. या काळात महादेवाची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे.

Siddheshwar Temple
सिद्धेश्वर महाराज मंदिर

By

Published : Aug 9, 2021, 4:30 PM IST

Updated : Aug 9, 2021, 4:55 PM IST

सोलापूर -सर्वांत महत्वाचे व्रत म्हणजे श्रावण सोमवार होय. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू पंचांगातील श्रावण हा पाचवा महिना आहे. निसर्गरम्य वातावरणासाठी देखील श्रावण महिन्याला ओळखले जाते. या काळात महादेवाची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. भगवान शिव आणि पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात. पण कोरोना महामारीमुळे सर्व शिव मंदिरे बंद करण्यात आली आहेत. सोलापुरातील प्रसिद्ध असे श्री सिद्धेश्वर मंदिर देखील बंद आहे. गेल्या साडे नऊशे वर्षांपासून सोलापुरातील श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात श्रावण महिन्यातील दर सोमवारी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आणि पूजेसाठी दाखल होत होते. परंतु, राज्य शासनाने दिलेल्या कोविड नियमावलीस अनुसरून मोजक्या विश्वस्तांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी संपन्न केले आहेत. सर्वसामान्य भाविकांना मात्र मंदिर प्रवेश दर्शनासाठी बंद आहेत.

माहिती देताना पुजारी गुरुराज हब्बू आणि पंचांगकर्ते मोहन दाते
  • श्रावण सोमवारचे महत्व-

श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असणारा महिना आहे. पौराणिक कथेनुसार या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास मोठ्या भक्तीभावाने केवळ एका बेलाचे पान भगवान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते.

श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर

हेही वाचा -वाराणशी: श्रावण सोमवारनिमित्त विश्वेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

  • पौराणिक कथा-

एका राजाला उपासना करण्याचा आदेश एका शिवभक्ताने दिला होता. तुझ्या राज्यावर येणारे संकट दूर होईल. मात्र, राज्यातील महादेव शिवलिंग मंदिरात असलेलं गाभारा दुधाने भरला पाहिजे. राजाने आपल्या राज्यातील सर्व प्रजेला आदेश दिला होता की, शिवलिंग मंदिरात दूध अर्पण करावे. प्रजेने आपल्या लहान मुलांना दूध न पाजता आणि गायींच्या वासरांना देखील दूध न पाजता सर्व दूध शिवलिंगाच्या गाभाऱ्यात अर्पण करत होते. पण गाभारा काही भरत नव्हता. यावेळी एका महिलेने आपल्या मुलांना दूध पाजून राहिलेले दूध गाभाऱ्यात अर्पण केली. महादेव मंदिरातील शिवलिंग गाभारा दुधाने भरला. त्यावेळी राजाने आश्चर्यचकित होऊन विचारले आणि त्याला त्याचा बोध कळलं. आपण सर्व गोष्टी त्याग न करता केला पाहिजे. परमार्थ करताना काय गोष्टी केल्या पाहिजे याबाबतही कथा आहे.

श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर
  • साडेनऊशे वर्षाची परंपरा खंडित-

सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर सोलापुरात गेल्या साडेनऊशे वर्षापासून आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात शिवभक्त आनंदाने आणि भक्तिभावाने श्रावण सोमवारी दर्शनासाठी दाखल होतात आणि पूजा करतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट असल्याने मंदिर बंद केले आहे. श्रावण सोमवारी भक्तांची गर्दी होईल आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती व्यक्त केली आहे. म्हणून मंदिर प्रशासनाने किंवा विश्वस्तांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून सर्व धार्मिक विधी सोमवारी पहाटेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण केले.

हेही वाचा -जाणून घ्या; अर्धनारेश्वर भीमाशंकर आणि भीमा नदीची आख्यायिका

Last Updated : Aug 9, 2021, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details