सोलापूर -शहराजवळ असलेल्या लाकडाच्या वखारीला मोठी आग लागली होती. पहाटे 5 च्या सुमारास ही आग लागली होती. लाकूड वखारीतील सागवान लाकडाचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्या नंतर 15 बंब पाणी मारण्यात आले. मात्र, आग आटोक्यात आलेली नव्हती, पण आता आग अटकोक्या आली आहे.
सोलापुरातील वखारीला भीषण आग, ५० लाखाहून अधिकचे नुकसान
शहराजवळ असलेल्या लाकडाच्या वखारीला मोठी आग लागली होती. पहाटे ५सुमारास ही आग लागली असून १५ बंब पाणी मारण्यात आलेअसूनही आग आटोक्यात आलेली नव्हती. मात्र, आता आगा अटोक्यात आली आहे.
सोलापूर शहराजवळील सोरेगाव येथे पिसे इंडस्ट्रीज ही लाकडाची वखार आहे. याठिकाणी ही आग लागली होती. मालक दीपक पिसे यांनी सांगितले आहे की, पहाटे पाच वाजता आग लागली त्यावेळी वॉचमन तिथे होता, फॅक्टरी बंद होती. धूर येऊ लागल्यावर त्यांना कळवले लगेचच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. सकाळी दहा वाजेपर्यंत पंधरा पाण्याचे बंब पाणी फवारणी करून गेलेत तरीही आग धुमसत होती. साग लाकूड कटाई करत असताना काही स्पार्किंग किंवा ठिणग्या उडणे असे प्रकार होतात त्यामुळे आग लागली असावी, असा ही प्राथमिक अंदाज आहे.
नुकसान लाखो रुपयांच्या घरात आहे. प्राथमिक माहितीनुसार 50 लाखापेक्षा अधिक किमतीचं लाकूड आणि मशिनरी तसेच शेड असे साहित्य जळून खाक झाले आहे. सोरेगाव गजानन महाराजांच्या मठाच्या समोर आतील बाजूस शेतामध्येच ही फॅक्टरी आहे.