महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सोलापूर शहरातील आठवडी बाजार बंद - कोरोना घडामोडी सोलापूर आठवडी बाजार बंद

सोलापूर शहर व जिल्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे टाळेबंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कमी झालेल्या कोरोना विषाणूने पुन्हा जोर धरला आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून सोलापूर शहर प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने नियमावली कडक केली आहे.

सोलापूर
सोलापूर

By

Published : Mar 24, 2021, 4:48 PM IST

सोलापूर- शहरात मंगळवार बाजार आणि बुधवार बाजार असे दोन मुख्य बाजार दर आठवड्याला भरले जातात. पण शहरात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहर व जिल्ह्यात आजतागायत वर्षभरात 57 हजार 319 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 1908 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीपासून आजतागायत 7 लाख 60 हजार 185 जणांची चाचणी करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून सोलापूर शहरात दर आठवड्याला भरत असलेले मंगळवार बाजार पोलिसांनी बंद केले तर बुधवारी भरणारे बुधवार बाझार पोलिसांनी भरूच दिला नाही.

सोलापूर

सोलापूर शहरात आजतागायत 1 लाख 94 हजार 780 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामधून 14 हजार 257 जणांना कोरोनाची लागण झाली. 694 रुग्णांचा शहरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस या तालुक्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने ग्रामीण भागात आजतागायत 5 लाख 65 हजार 405 जणांची चाचणी केली आहे. त्यामध्ये 43 हजार 62 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागात 1214 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


सोलापूर शहर व जिल्हा टाळेबंदीच्या उंबरठ्यावर-

सोलापूर शहर व जिल्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे टाळेबंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कमी झालेल्या कोरोना विषाणूने पुन्हा जोर धरला आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून सोलापूर शहर प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने नियमावली कडक केली आहे. मास्क, सुरक्षित अंतर, स्वच्छता आदींवर भर दिला जात असून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

मंगळवार बाझार आणि बुधवार बाझार पुन्हा बंद-

दर आठवड्याला शहरात मंगळवारी आणि बुधवारी आठवडी बाजार भरतो. येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शेवटी शहर प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मंगळवार बाजार बंद केला आणि बुधवारी भरणाऱ्या बझारला भरूच दिले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details