माढा - लोकसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील निमगाव येथील ईव्हीएम मशीन सकाळी ७ वाजल्यापासून बंद होते. मतदार केंद्र क्रमांक २६९ जिल्हा परिषद शाळेतील ईव्हीएम बंद पडले होते. निमगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचे गाव आहे.
माढा मतदारसंघातील निमगावात ईव्हीएम बंद, १ तास उशीराने मतदानाला सुरुवात - माढा
मतदार केंद्र क्रमांक २६९ जिल्हा परिषद शाळेतील ईव्हीएम बंद पडले होते. निमगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचे गाव आहे.
माढा निमगांव येथे मतदानाला उशीराने सुरुवात
ईव्हीएम मशीन सकाळी ७ वाजल्यापासून बंद होते. त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या असताना देखील १ तासापर्यंत मतदान झाले नाही. जवळपास ५० पेक्षाही जास्त मतदार मतदान करण्यासाठी वाट पाहत होते. ईव्हीएम मशीन सुरू झाली नसल्यामुळे नवीन मशिन मागविण्यात आली. मात्र, नवीन मशिन यायला १ तास उशीर लागला. नवीन मशिन आल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली आहे.
Last Updated : Apr 23, 2019, 9:45 AM IST