महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात कोरोना नियमांचे उल्लंघन; विना परवाना म्हशी पळवण्याचा कार्यक्रम

सोलापुरात आषाढ महिन्यानिमित्ताने म्हशी पळवण्याचा कार्यक्रम झाला. पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना हा कार्यक्रम घाईगडबडीत उरकण्यात आला.

f
सोलापुरात कोरोना नियमांचे उल्लंघन

By

Published : Aug 2, 2021, 4:43 AM IST

Updated : Aug 2, 2021, 4:57 AM IST

सोलापूर -शहरात आषाढ महिन्यानिमित्ताने म्हशी पळवण्याचा कार्यक्रम झाला. पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना हा कार्यक्रम घाईगडबडीत उरकण्यात आला. पण या कार्यक्रमावेळी मर्दा मंगल कार्यालय, कर्णिक नगर, साईबाबा चौक दरम्यान मोठी गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाला होता. आषाढी महिन्यानिमित्ताने गवळी समाजाच्यावतीने दरवर्षी हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो, पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर सोलापुरात बंदी घालण्यात आली आहे.

सोलापुरात विना परवाना म्हशी पळवण्याचा कार्यक्रम

कोरोना नियमांचे उल्लंघन; गुन्हा दाखल होईल का?

बंदी असताना देखील म्हशी पळविण्यात आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो का नाही याकडे लक्ष लागले आहे. करण म्हेत्रे या सामाजिक कार्यकर्त्याच्या अंतिम संस्कारावेळी मोठी गर्दी निर्माण झाली होती. त्यावेळी सदर बाजार पोलिसांनी कडक भूमिका घेत जवळपास 150 नागरिकांवर गुन्हे दाखल केले होते. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हशी पळविण्यात आल्या. जवळपास 150 ते 200 नागरिक या वेळी जमले होते.

सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा-

म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती. मर्दा मंगल कार्यालयासमोरील रस्ता गर्दीने खचाखच भरला होता. सोशल डिस्टन्सचे कोणीही पालन करताना दिसत नव्हते. तसेच गर्दीत क्वचित लोकांच्या तोंडावर मास्क दिसले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली असल्याने आता गुन्हा दाखल होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Aug 2, 2021, 4:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details