महाराष्ट्र

maharashtra

...अन्यथा पुन्हा वाहन जप्ती अन् दुकाने सील करू, पोलीस आयुक्त शिंदे यांचा इशारा

By

Published : Jun 13, 2020, 2:05 PM IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेले नियम मोडल्यास वाहने जप्त करण्यात येतील आणि दुकाने सील करण्यात येतील, अस इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.

police commissioner office
पोलीस आयुक्तालय, सोलापूर

सोलापूर - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेले सार्वजनिक नियम मोडल्यास किराणा दुकान सील, हातगाडी, मोटारसायकल, कार जप्तीची कारवाई पुनश्च सुरू करणार असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई 30 जूनपर्यंत केली जाणार आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे
सोलापुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. असे असताना अनेक जण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत आहेत. यापूर्वी टाळेबंदीच्या काळात नियम मोडणाऱ्यांची वाहने जप्त केली गेली होती. शासनाने टाळेबंदीमध्ये काहीअंशी सशर्त शिथिलता देण्यात आली आहे. दुकाने ठराविक वेळी उघडावी, मोटारसायकलवर केवळ एकच व्यक्तीने प्रवास करावा, तीनचाकी व चारचाकी वाहनामध्ये चालकाव्यतिरिक्त केवळ दोघांनी प्रवास करावा. एखाद्या ठिकाणी खरेदी करताना सुरक्षित अंतर ठेवावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी या नियमांना हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. यामुळे आता पुन्हा जप्तीची कारवाई सुरू करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

आज नवीपेठ परिसरात मोठी गर्दी झाली होती त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यापुढे नियामांचे पालन न केल्यास वाहने, हातगाडी 30 जूनपर्यंत जप्त करण्यात येईल. तसेच नियम मोडणारी दुकाने सील करण्यात येतील, असा इशाराही पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 12 जून) सकाळी 8 वाजण्यापासून आज (दि. 13 जून) सकाळी 8 वाजेपर्यंत शहरातील 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीत मोटार वाहन कायद्यानुसार तब्बल 450 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ‘त्यांनी' साकारले शिवारघर

ABOUT THE AUTHOR

...view details