सोलापूर- आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या या उपयूक्त असून त्यांचा आहारात वापर केल्याने आरोग्य चांगले राहते. याची माहिती सर्व सामान्य शहरी लोकांना व्हावी, या हेतून कृषी विभागाच्या वतीने रानभाजी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहरातील नेहरू नगर येथे भरविण्यात आलेल्या या रानभाजी बाजाराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
रानावनात अनेक भाज्या अशा आहेत, की ज्या रानभाज्या खाल्याने आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. मात्र अनेक रानभाज्या अशा आहेत की ज्यांची अनेकांना माहिती नाही. ज्या रानभाज्या शहरातील लोकांना माहिती नाहीत, या भाज्यांची माहिती व्हावी आणि लोकांचे आरोग्य देखील चांगले रहावे, यासाठी सोलापूर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी बाजार भरविण्यात आला होता.
माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या दररोजच्या जेवणात वापरल्या जातात. मात्र बांबूच्या कोवळ्या पानांची, सराटा, केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी, कुरडू या रानभाज्यांचीही भाजी होते, हे माहिती नसते. रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. याचा रोजच्या आहारात वापर वाढण्याच्या दृष्टीने रानभाज्यांची माहिती सर्वसामान्य लोकांना होणे गरजेचे आहे. त्यासाठी हा भरविण्यात आला होता.