सोलापूर-सोलापूर जिल्ह्यातील (Splapur District) परितेवाडी या खेड्यात जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक रणजितसिंह डिसले (Teacher Ranjeetsinh Disale) यांना अमेरिकन सरकारकडून (USA Government) दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप (Fulbright Scholarship) जाहीर झाली आहे. पीस इन एज्युकेशन (Peace in Education) या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात (American University) अधिक संशोधन करण्यासाठी डिसले गुरुजींना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली. रणजितसिंह डिसले यांना ही स्कॉलरशिप जाहीर झाल्याने देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Fulbright Scholarship to Disale Guruji : सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची 'फुलब्राईट' स्कॉलरशिप - अमेरिकन सरकार
अमेरिकेतील विद्यापीठात संशोधन (Research at American University) करण्यासाठी सोलापूर जिल्हातील (Solapur District) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले (Teacher Ranjeetsinh Disale) यांना अमेरिकन सरकारकडून (USA Government) दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप (Fulbright Scholarship) जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी जगभरात 40 शिक्षकांना ही स्कॉलरशिप देण्यात येते.
75 वर्षांपासून जगभरातील शिक्षकांना दिली जाते शिष्यवृत्ती
जगभरातील प्रतिभावान शिक्षकांना एकत्र आणून जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची संधी या स्कॉलरशिपमुळे मिळते. अमेरिकेतील शिक्षणपद्धती (Teaching methods in the United States) जवळून अभ्यासण्याची संधी यामुळे मिळते. ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून, यंदाचे हे 75 वे वर्ष आहे.
अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी
'लेट्स क्रॉस द बॉर्डर' (Let's cross the border) या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार (Dissemination of the idea of non-violence) करण्याचे काम ते करत आहेत. या विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळणार याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.