सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा प्रवास आज दुपारनंतर प्लस पातळीकडे सुरू झाला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा मिळणार आहे.
दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ - water lever
या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील नदी खोऱ्यात याआधी दमदार पाऊस झाला आणि आताही सुरू आहे. त्यामळे पाण्याचा मोठा विसर्ग काळमोडी, खडकवासला, चासकमान, आद्रा, कासारसाई या धरणात पाण्याचा मोठा विसर्ग आला. तो प्रवाह आता पुढे उजनी धरणात येत आहे.
चालुवर्षी उजनी धरण वजा 59.88 टक्क्यांवर पोहचले होते. या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील नदी खोऱ्यात याआधी दमदार पाऊस झाला आणि आताही सुरू आहे. त्यामळे पाण्याचा मोठा विसर्ग काळमोडी, खडकवासला, चासकमान, आद्रा, कासारसाई या धरणात पाण्याचा मोठा विसर्ग आला. तो प्रवाह आता पुढे उजनी धरणात येत आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी झालेल्या धरणात जवळपास 60 टक्के पाणी आलेले आहे. तसेच आणखी 100 टक्के पाणी येण्याची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आहे. सध्या बंडगार्डनमधून 26824 क्यूसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. मार्गात येणाऱ्या पाण्याची भर पडून हा विसर्ग आणखी वाढणार आहे.
गेल्यावर्षी 110 टक्के भरलेले उजनी धरण पाण्याच्या साठमारीमुळे मायनसमध्ये गेले होते.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद आणि काही प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश शेती पिकांना तसेच पाणीपुरवठा योजनांना मोठा फटका बसला होता. त्यातून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त अन उजनीवर विसंबून असणाऱ्या जनतेचे संपूर्ण लक्ष उजनीच्या पाणीसाठ्यांकडे लागले होते. आता धरणाची वाटचाल प्लस साठ्याकडे सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.