सोलापूर:सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा नजीक अशोक हॉटेलच्या समोर दुचाकी व मालवाहतूक हायवाच्या टिपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. Solapur Accident या भीषण अपघातात solapur to tuljapur terrible accident दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले आहेत. ही घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. ही घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. रवींद्र नागनाथ अलशेट्टी (वय 22 वर्ष, रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर), व्यंकट साई सूर्यप्रकाश कत्तीयांनी (वय 24 वर्ष, रा नवीन विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर) नवरात्र उत्सव असल्याने दोघे दुचाकीवरून तुळजापूरला आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तुळजापूर हुन परत येताना सोलापूर शहराजवळ काळाने दोघांवर झडप घातली आहे.
Solapur Accident : तुळजापूर देवीच्या दर्शनाहून परतताना दोन मित्रांवर काळाची झडप - दोघा मित्रांवर काळाची झडप
Solapur Accident: सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा नजीक अशोक हॉटेलच्या समोर दुचाकी व मालवाहतूक हायवाच्या टिपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. Solapur Accident या भीषण अपघातात solapur to tuljapur terrible accident दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले आहेत. ही घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे.
![Solapur Accident : तुळजापूर देवीच्या दर्शनाहून परतताना दोन मित्रांवर काळाची झडप Solapur Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16537762-949-16537762-1664727542528.jpg)
दर्शनासाठी तुळजापूरला गेले होतेदुचाकीवरील दोन्ही युवकांची ओळख पटलेली आहे. दोघे नवीन विडी घरकुल या परिसरात राहावयास आहेत. नवरात्र उत्सव असल्याने सोलापुरातील अनेक नागरीक दुचाकी किंवा इतर वाहनाने तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. रवींद्र व व्यंकटसाई हे दोघे सकाळी MH13DH0074 या दुचाकीवरून परत येत होते. टिपर क्रमांक MH13DQ4010 हा देखील सोलापूरच्या दिशेने येत होता, पण ओवर टेक करण्याच्या नादात दुचाकीवर असलेल्या दोघा मित्रांचा नियंत्रण सुटला.
टिपर खाली दोघे चिरडलेओव्हरटेक करण्याच्या घाईगडबडीत रवींद्र व व्यंकटसाई हे दोघे टिपर खाली आले. टिपरचा वेग अधिक असल्याने ब्रेक लवकर लागले नाही. पण तोपर्यंत दोघे चिरडले गेले. रस्त्यावर दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले होते. या अपघातामुळे वाहतूक व्यवस्था खोळंम्बली होती.पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह जहांगीर शेख यांच्या रुग्णवाहिकेमधून सिव्हिल हॉस्पिटलला आणले आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.