महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दहा रुपयांच्या माव्यावरून मित्राचा घेतला जीव; चापट मारून मृत्यू झाल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - solapur crime news

बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे म्हणाले, की शकील शेख या संशयित आरोपीने खून करण्याच्या उद्देशाने मारहाण केली नाही. त्याने मुर्तुज याच्या गालावर एक चापट मारली. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

आरोपीला अटक करताना पोलीस
आरोपीला अटक करताना पोलीस

By

Published : Oct 30, 2020, 4:41 PM IST

Updated : Oct 30, 2020, 7:41 PM IST

सोलापूर- दहा रुपयांचा माव्यावरून झालेल्या हाणामारीत तरुणाने जीव गमाविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वादात मित्राने चापट मारल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील शानदार चौकात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शकील बाशा शेखला ताब्यात घेतले आहे. मुर्तुज फरदिन शेख (वय 33 रा कुर्बान हुसेन नगर,सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शकील शेख व मुर्तुज शेख दोघे मित्र आचारीचे काम करीत होते. गुरुवारी रात्री शानदार चौक येथे मावा खात दोघे कुर्बान हुसेन नगर जवळील दुकानासमोर बोलत बसले होते. दहा रुपयांच्या माव्यावरून त्यावेळी दोघांत वाद सुरू झाले. वाद होत असताना इतर लोकांनी वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला. पण काही वेळाने रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला दोघात किरकोळ हाणामारी झाली. या हाणामारीत शकील शेख याने मुर्तुज शेखच्या गालावर जोराची चापट मारली. यातच मुर्तुजचा मृत्यू झाला.

चापट मारून मृत्यू झाल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू-

मुर्तुज शेख जाग्यावरच बेशुद्ध झाला होता. कयूम रझाक पटेल यांनी बेशुद्ध मुर्तुजला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही घटना संबंधित पोलीस ठाण्याला कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पहाटेच्या सुमाराला संशयित आरोपी शकील शेख याला अटक केले आहे. शुक्रवारी दिवसभर आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे म्हणाले, की शकील शेख या संशयित आरोपीने खून करण्याच्या उद्देशाने मारहाण केली नाही. त्याने मुर्तुज याच्या गालावर एक चापट मारली. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. मृताच्या अंगावर किंवा डोक्यावर मारहाण झाल्याचे वण किंवा जखमा नाहीत. म्हणून पोलिसांनी शकील यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Oct 30, 2020, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details