महाराष्ट्र

maharashtra

सोलापुरात 1 हजार 145 कोरोनाबाधितांची वाढ, 40 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Apr 20, 2021, 1:54 AM IST

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 1145 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सोलापुरात एकूण 40 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत असताना सोमवारी मृतांचा आकडा वाढला आहे.

सोलापुरात 1 हजार 145 कोरोनाबाधितांची वाढ
सोलापुरात 1 हजार 145 कोरोनाबाधितांची वाढ

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात 1145 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सोलापुरात एकूण 40 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत असताना सोमवारी मृतांचा आकडा वाढला आहे. शहरात 23 तर ग्रामीण भागात 17 बाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.

सोलापूर शहरात 23 जणांचा मृत्यू

सोलापूर शहरात 23 बाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने वाढत्या आकड्यामुळे प्रशासन हादरले आहे. सोलापुरातील 436 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित रुग्णांमध्ये 249 पुरुष आहेत. तर 187 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. 342 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ग्रामीणमध्ये 17 जणांचा मृत्यू

सोलापूरच्या ग्रामीण भागात 709 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 418 पुरुष तर 291 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. 17 बाधित रुग्ण उपचार घेत असताना दगावले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये 12 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात 993 जण कोरोनावरील उपचार घेत असताना बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा -CORONA VIRUS : राज्यात नव्या 58 हजार 924 रुग्णांची नोंद, 351 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details