महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 2009 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

By

Published : May 4, 2021, 10:51 PM IST

सोलापूर शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 2009 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात 47 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Today, 2009 patients report positive in Solapur city and rural areas of the district
सोलापूर शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 2009 रुग्णांचा अहवाल पॉजीटिव्ह

सोलापूर- सोलापुरातील शहर आणि जिल्ह्यात 2009 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शहरात 168 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागातील विविध तालुक्यात 1841 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोलापुरातील विविध रुग्णालयात उपचार घेत 47 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आज पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक बरे झालेल्याची संख्या आहे. 401 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ग्रामीण भागात 1273 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

सोलापूर शहरात आज 168 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण तर 9 जणांचा मृत्यू -


सोलापूर शहरात मंगळवारी 2686 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 168 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 104 पुरुष आणि 64 स्त्रीयांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोलापूर शहरात आज कोरोनावर मात करून 401 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 18 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये 9 पुरुष आणि 9 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात कोरोना विषाणूची लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. विषाणूची लागण झालेल्यांपेक्षा बरे झालेल्याची संख्या अधिक आहे.

सोलापूरच्या ग्रामीण भागात -


सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात आज मंगळवारी 1841 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आज मंगळवारी जिल्हा आरोग्य प्रशासनाने 9 हजार 194 जणांची तपासणी केली होती. त्यामधून 1841 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 22 पुरुष आणि 7 स्त्रिया आहेत. आज माळशिरस तालुक्यात 348 रुग्ण म्हणजेच सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मंगळवेढा 326 रुग्ण, पंढरपूर 255 रुग्ण, बार्शी 230 रुग्ण, माढा 179 रुग्ण, करमाळा 142 रुग्ण आढळले आहेत. अक्कलकोट (38 रुग्ण) आणि दक्षिण सोलापूर (36 रुग्ण) या तालुक्यात सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details