सोलापूर -शहरातील सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुमठा नाका येथील क्रीडासंकुल येथून दुचाकी चोरीला गेली होती. शास्त्रीनगर पोलीस चौकीतील पोलिसांनी गुन्हा दाखल होताच पाच तासाच्या आतच तीन संशयित चोरांना अटक करून चोरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
5 ऑगस्टला सागर गव्हाणे( वय 30 रा दहिटने, सोलापूर) हे कुमठा नाका येथील क्रीडा संकुल येथे आले होते. परंतु, दुचाकी पार्क करताना ते गाडीची चावी काढण्याचे विसरले होते. याचाच फायदा घेत, चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. त्यांनतर 6 ऑगस्टला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सागर गव्हाणे यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात दुचाकी वाहन चोरी गेल्याची तक्रार दाखल केली.
सदर बझार पोलीस ठाण्याअंतर्गत शास्त्री पोलीस चौकीच्या पीएसआय अल्फाज शेख यांनी तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळवली. त्यावेळी हिरव्या रंगाची मेस्ट्रो दुचाकी घेऊन संत तुकाराम चौकात एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.