महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परीक्षा पध्दतीविरोधात हजारो विद्यार्थ्यांचे सोलापूर विद्यापीठ समोर आंदोलन - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठातील यामध्ये नागपूर, जळगांव, गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई व इतर विद्यापीठामध्ये कुलगुरुनी ऑफलाईन (MCQ) बहुपर्यायी पध्दतीने परिक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये 50 प्रश्ना पैकी 40 प्रश्न सोडवण्याची मुभा आहे. 1 प्रश्न 2 मार्काचा त्यास 90 मिनिटाचा वेळ दिला आहे. तसेच विद्यार्थ्याचे ऑनलाईन शिक्षण झाल्यामुळे व अपुर्ण अभ्यासक्रम असल्यामुळे परिक्षेच्या 15 दिवस आगोदर अभ्यासक्रमामधीलच 100 ते 150 प्रश्नाचा प्रश्नसंच देण्यात आलेला होता.

thousands of students protest in front of solapur university against examination system
परीक्षा पध्दतीविरोधात हजारो विद्यार्थ्यांचे सोलापूर विद्यापीठ समोर आंदोलन

By

Published : Jul 14, 2022, 8:12 PM IST

Updated : Jul 14, 2022, 8:29 PM IST

सोलापूर -सोलापूर विद्यापीठासमोर हजारो विद्यार्थ्यांनी यंदाच्या होणाऱ्या परीक्षा पद्धतीचा तीव्र विरोध केला आहे. विद्यार्थ्यांचा मोठा लोंढा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर जमा झाला आणि परीक्षा पध्दती विरोधात घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू असल्याने प्रहार जनशक्ती व शेतकरी संघटना आणि युवा सेनेचे माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. यंदा होणारी ऑफलाईन परीक्षा रद्द करा, आणि ऑनलाइन परीक्षा घ्या अशा विविध मागण्या करत सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर आंदोलन केले.विद्यापीठ प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीनी गेट ढकलून आत प्रवेश केला आणि कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मुख्य प्रशासकीय इमारती खाली धरणे आंदोलन केले.

परीक्षा पध्दतीविरोधात हजारो विद्यार्थ्यांचे सोलापूर विद्यापीठ समोर आंदोलन

महाराष्ट्र राज्यातील इतर विद्यापीठाप्रमाणे परीक्षा घ्या -महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठातील यामध्ये नागपूर, जळगांव, गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई व इतर विद्यापीठामध्ये कुलगुरुनी ऑफलाईन (MCQ) बहुपर्यायी पध्दतीने परिक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये 50 प्रश्ना पैकी 40 प्रश्न सोडवण्याची मुभा आहे. 1 प्रश्न 2 मार्काचा त्यास 90 मिनिटाचा वेळ दिला आहे. तसेच विद्यार्थ्याचे ऑनलाईन शिक्षण झाल्यामुळे व अपुर्ण अभ्यासक्रम असल्यामुळे परिक्षेच्या 15 दिवस आगोदर अभ्यासक्रमामधीलच 100 ते 150 प्रश्नाचा प्रश्नसंच देण्यात आलेला होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अट किंवा A, B, C, D, E,F कोड पध्दत नव्हती. एमसीक्यू (MCQ ) परिक्षा ही सर्व साधारण (जनरल) पध्दतीची परिक्षा पध्दत घेण्यात आली. काही ठिकाणी विविध विद्यापीठात घेतली जात आहे. कोल्हापूर विद्यापीठाने याच पध्दतीनुसार परिक्षा पध्दत अवलंबीली आहे.

सोलापूर विद्यापीठ या पद्धतीनुसार परीक्षा घेत आहे -यंदाच्या वर्षी सर्व शाखांच्या अंतिम परिक्षा या A, B, C, D, E, F कोड पध्दतीने घेण्यात येत आहे. परिक्षेसाठी फक्त 60 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. विद्यार्थ्याना प्रश्नसंच दिला जाणार नाही. वर्गा मध्ये बाहेरील चार चार सुपरवायझर नेमण्यात आलेले आहेत. परिक्षेच्या निकाला नंतर रिचेकींग, रिव्हयाल्युशन करुन मिळणार नाही व त्याचे फोटोकॉपी मिळणार नाही. उत्तर पत्रिके सोबत प्रश्न पत्रिका कढून घेतली जाणार आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या -परीक्षेत A,B,C,D,E,F कोड जाचक अटीचे परिक्षा पध्दत त्वरीत रद्द होवून सर्व साधारण पध्दतीने परिक्षा घेण्यात यावी. सोलापूर विद्यापीठाकडून इतर विद्यापीठा प्रमाणे 50 पैकी 40 प्रश्न सोडवण्याची मुभा असावी.विद्यापीठा कडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षेसाठी ज्या त्या शाखेतील अभ्यासक्रमातीलच प्रश्न पत्रिका काढण्यात यावी व त्यासाठी विद्यार्थ्यांना तात्काळ 100 ते 150 प्रश्नाचा प्रश्नसंच देण्याची व्यवस्था करावी. परिक्षेचा कालावधी 90 मिनिटाचा असावा जेणे करून विद्यार्थ्याना उत्तर पत्रिकेमधील संबंधित विषयाची माहिती भरता यावी. व दिलेल्या प्रश्न संचा मधील प्रश्न वाचून उत्तर पत्रिके मधील गोल भरण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल.वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे सोलापूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या वर्षी देखील ऑनलाइन घ्याव्या. या करत हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासमोर आंदोलन केले.

Last Updated : Jul 14, 2022, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details