सोलापूर -सोलापूर पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ हे नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात पदभार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नव्या पोलीस आयुक्तांसमोर चोरट्यांनी नवे आवाहन उभे केले आहे. सोलापूर शहरात मध्यभागी असलेल्या चौपाड येथील एस.एस. कम्युनिकेशन हे मोबाइल ( S.S. Communication mobile shop Solapur ) दुकान फोडून जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये साडे आठ लाखांचे स्मार्ट मोबाइल ( Mobile Shop Theft ) व दीड लाखांची रोखडचा समावेश आहे. ही घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांचे पथक सोमवारी सकाळी पोहोचले असून पंचनामा, डॉग स्क्वाड आदी, फिंगर प्रिंट आदी कामकाज करत तपास सुरू केला आहे.
चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात चोरट्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. दुकानाचे मालक विशाल अहुजा यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सोलापूर शहर पोलिसांना माहिती दिली आहे.