सोलापूर: कॉलेजच्या एका अल्पवयीन मुलीचा कर्नाटकातील चडचण येथे होणारा बालविवाह मंगळवेढा पोलिसांनी रोखला. मुलीच्या आई- वडिलांचे व मुलीचे समुपदेशन करून त्या अल्पवयीन मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले. सदर अल्पवयीन मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तीने शिक्षणासाठी विवाह रोकावा अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी मध्यस्थी करून समुपदेशन केले. व हा बालविवाह रोखला.
नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरवर संपर्क :मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील एका १६ वर्षे १६ दिवस पूर्ण झालेल्या मुलीचा कर्नाटकातील निंबर्गी येथील एका २४ वर्षीय मुलाशी २१ जुलै रोजी कर्नाटकात बालविवाह करण्याची तयारी सुरु होती. मात्र, त्या अल्पवयीन कॉलेज तरूणीस हा बालविवाह मान्य नसल्याने तिने थेट सोलापूर येथील पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरवर संपर्क साधून या अल्पवयीन विवाहाबाबतची माहिती दिली.