सोलापूर - महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सोलापूर शाखेच्यावतीने शुक्रवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करत काळ्या फिती लावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आंदोलन केल्याने सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कामे रखडली होते.10 वर्षांपासून या पदोन्नती रखडल्या असल्याने रखडलेल्या पदोन्नती ताबडतोब देण्यात याव्या, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी केली.
तहसीलदारांच्या या आहेत मागण्या -नायब तहसिलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे. तहसिलदार संवर्गाची सन 2011 पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे. नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात पदोन्नती करणे.तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे.नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे. परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे. नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे.नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे.सेवा निवृत्त नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ तात्काळ निकाली काढणे.महिला अधिकाऱ्यांचे बाबतीत महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्यांने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे.या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.