महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खळबळजनक.. शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या, सोलापुरातील घटना - सोलापूर गुन्हेवृत्त

एका शिक्षक पतीने शिक्षिका पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापुरात घडली आहे. दोघे पती-पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Teacher kills teacher's wife
शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीची हत्या

By

Published : Dec 14, 2020, 10:05 PM IST

सोलापूर - एका शिक्षक पतीने शिक्षिका पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापुरात घडली आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे. अर्चना विकास हरवाळकर (वय 35 रा, गीता अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया कॉलनी, जुळे सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विकास विश्वनाथ हरवाळकर (वय 37 रा, गीता अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया कॉलनी) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

शेअर बाजारात झालेल्या कर्जाला कंटाळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती-

विकास हरवाळकर यास शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कर्ज झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खून का झाला? किंवा खुनाचे नेमके कारण काय? याचा सर्व तपशील पोलीस तपासानंतर समोर येईल.

दोघे जिल्हा परिषद शिक्षक -

मृत पत्नी अर्चना यास आज सोमवारी सकाळी पती विकास याने दगडी वरवंटा डोक्यात मारून खून केला. कर्ज प्रकरणातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. दोघे पती-पत्नी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहेत. या दाम्पत्यास वेदांत हा सहा वर्षीय मुलगा देखील आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न, सिव्हीलमध्ये उपचार सुरू -

पती विकास हरवाळकर याने पत्नीला ठार केल्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

व्हॉटसअप स्टेट्सवर संदेश देत मागितली माफी-

नातेवाईक प्रणय कांबळे यांनी विकास हरवाळकर यांचे व्हॉटसअप स्टेट्सवरून घर गाठले. संशयीत आरोपींने मला माफ करा, मी हरलो असे संदेश स्टेट्सवर ठेवले होते. घराचा दरवाजा आतून बंद होता. दार तोडून आतमध्ये प्रवेश करून खून झाल्याचे प्रकरण समोर आले.

ABOUT THE AUTHOR

...view details