पंढरपूर -पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासनाकडून कठोर उपाययोजनाही करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रुग्णासोबत येत असल्यामुळे धोका वाढत आहे. तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड सेंटर किंवा कोविड हॉस्पिटल जवळ न थांबता घरी जाण्याचे आवाहन पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी नातेवाईकांना केले आहे.
प्रांत कार्यालयात कोरोना संदर्भातील कक्षाची उभारणी
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांना योग्य ते वेळेवर उपचार मिळावेत, या हेतूने पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रांत कार्यालयात कोरोना संदर्भातील पक्षाची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये कोरोना संदर्भातील विविध अडचणी सोडवण्यासाठी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोविड हॉस्पिटलची माहिती, कोविड केअर सेंटरची माहिती, कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलाबाबत तक्रार अशा निवारण कक्षात करण्यात येणार आहे.