सोलापूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाळे परिसरातील एका युवा चित्रकाराने गांधीजींना अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयाच्या मैदानावर छोट्या दगडांत प्रतिमा साकारली आहे. सिंहगड येथील महाविद्यालयाच्या मैदानावर प्रतिक तांदळे या युवा चित्रकाराने हे 12 दिवसांत साकारले आहे.
गांधी जयंती विशेष : खडींमधून साकारली महात्मा गांधींची प्रतिमा
सोलापुरात महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त एका कलाकाराने खडीचा प्रतिमा साकारुन गांधीजींनी आदरांजली वाहिली आहे.
या प्रतिमेसाठी प्रतिकला एक ब्रास खडी लागली. महात्मा गांधी यांची दगडाची प्रतिमा 100 बाय 135 फूट(100×135 फूट) आकाराची आहे. प्रतिक तांदळे हा युवा चित्रकार काही तरी वेगळे करण्यात पटाईत आहे. यापूर्वी त्याने हरित गणरायाची अर्धा एकर मध्ये प्रतिमा साकारली होती.
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला होता. दरवर्षी 2 ऑक्टोबर भारतात गांधी जयंती साजरा केली जाते तर 2 ऑक्टोबर रोजी जागतिक अहिंसा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ उपाधी देण्यात आली. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला.
आज 2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी केली जात आहे. या जयंती निमित्ताने प्रतिक तांदळे या चित्रकाराने केगाव येथील सिंहगड येथील मैदानावर दगडाच्या सहाय्याने गांधीजीची प्रतिमा साकारली आहे.