महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांची विशेष एक्सप्रेस ट्रेन सोलापुरातून मुंबईला रवाना

सोलापूर मध्य रेल्वे विभागात महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांची विशेष ट्रेन म्हणजेच उद्यान एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे. यावेळी सोलापूर मध्य रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला कर्मचाऱ्यांची विशेष एक्सप्रेस ट्रेन सोलापुरातून मुंबईला रवाना
महिला कर्मचाऱ्यांची विशेष एक्सप्रेस ट्रेन सोलापुरातून मुंबईला रवाना

By

Published : Mar 8, 2021, 7:48 PM IST

सोलापूर - सोलापूर मध्य रेल्वे विभागात महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांची विशेष ट्रेन म्हणजेच उद्यान एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे. यावेळी सोलापूर मध्य रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज (सोमवारी) सकाळी सर्व कारभार महिलांना पाहिला. यावेळी लोको पायलट अनिता राज आणि सहायक लोको पायलट भावना कोष्टी यांनी उद्यान एक्सप्रेसची सूत्रे हातात घेऊन एक्सप्रेस मुंबईकडे रवाना केली.

महिला कर्मचाऱ्यांची विशेष एक्सप्रेस ट्रेन सोलापुरातून मुंबईला रवाना
सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती -

8 मार्च हा दिवस मध्य रेल्वे विभागात मोठया उत्साहाने साजरा केला जातो. त्याअनुषंगाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सर्व कारभार महिलांच्या हाती देण्यात आला. डीआरएमपासून ते सिक्युरिटी गार्डपर्यंत सर्व जबाबदारी महिलांना देण्यात आली होती. डीआरएम शैलेंद्र गुप्ता यांच्या सुविद्य पत्नी यांनी हिरवा झेंडा दाखवत उद्यान एक्सप्रेस रवाना केली.
हे ही वाचा - २०२१-२२चा अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी समाधानकारक; कृषी तज्ज्ञ शरद निंबाळकरांचे मत

दरवर्षी महिला दिन महिलांच्या हाती सोलापूर मध्य रेल्वे विभाग -

सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे कामकाज दरवर्षी महिला दिनानिमित्त महिलांच्या हाती दिला जातो. यंदाच्या वर्षी देखील तिकीट परीक्षक, लोको पायलट, गार्ड, ट्रेन क्लार्क आदी पद महिलांनी हाती घेतले होते.
हे ही वाचा - अर्थसंकल्प २०२१-२२ : शेती क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद; तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज

पुरुषांपेक्षा महिलाचे कामकाज अधिक चांगले -

डीआरएम शैलेंद्र गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले की, महिला या पुरुषांपेक्षा अधिक योग्य रितीने काम करतात. यावेळी डीआरएम यांच्या हस्ते रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details