महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बार्शीत पोटच्या पोराने आईच्या डोक्यात घातला दगड - solapur crime

बार्शी पोलीस ठाण्याचे हवालदार अरुण माळी यांनी सांगितले, की पोलिसांना वाणी प्लॉट या ठिकाणी घराच्या कपाऊंड मध्ये एका महीला मयत अवस्थेत झुडपामध्ये पडलेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आमच्या हाती धक्कादायक माहिती लागली. मृतदेह रुक्मिणी नागनाथ फावडे वय 45 वर्षे रा वाणी प्लॉट बार्शी हिचाच असल्याचे तिच्या पतीने सांगितले. या प्रकरणी मुलावर पोलिसांचा संशय आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.

मयत महिला
मयत महिला

By

Published : Oct 13, 2021, 3:59 PM IST

Updated : Oct 13, 2021, 10:15 PM IST

सोलापूर -पोटच्या पोरानेच झोपलेल्या आईच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात समोर आली आहे. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गादीवरुन घराबाहेर ओढत आणून प्लास्टिकमध्ये गुंडाळून झुडपात टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे (वय वर्षे ४५,रा. वाणी प्लॉट,बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रीराम नागनाथ फावडे (वय वर्षे २१) असे आईच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मुलाचे नाव आहे. सध्या संशयित आरोपी मुलगा फरार आहे. बार्शी पोलीस पथक त्याला अटक करण्यासाठी मुंबईकडे गेले आहेत. लवकरच त्याला अटक करून खरी माहिती समोर आणली जाईल अशी माहिती बार्शी पोलिसांनी दिली आहे.

पैशाच्या कारणावरून सतत वाद होत होता-
पोलिस हवालदार अरुण माळी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात खुनाबद्दल फिर्याद दाखल केली आहे. वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याने मयत महिला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे हे दोघेजण बार्शी येथील वाणी फ्लॉट याठिकाणी राहत होते. तर लहान मुलगा व पती हे बार्शी शहरातील डंबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. तसेच मोठा मुलगा व मयत रुक्मिणी यांच्यात पैशावरुन नेहमी वाद होत होते. त्याबाबत पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी ही दाखल होत्या.

व्हाटस अप स्टेटस वरून पोलिस पथक मुंबईकडे रवाना-
मयत महिलेचे पती नागनाथ फावडे व त्यांचा लहान मुलगा लक्ष्मण यांच्याकडे बार्शी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेस्टस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरते कपडे त्याने नेल्याचे समोर आले आहे. यापुर्वीही श्रीराम याने आई व भावास मारहाण केले होते. मयत महिला रुक्मिणी यांस तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे यानेच त्याची आई मयत रुक्मिनी फावडे हीचा डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले असा संशय व्यक्त केला जात आहे.संशयीत आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे करत आहेत.

Last Updated : Oct 13, 2021, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details