महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Jawan Rameshwar Kakade : बार्शी तालुक्यातील जवानाला नक्षलवाद्यांसोबत दोन हात करताना वीरमरण; आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार

दोन दिवसापूर्वी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ( The clash with the Naxalites ) जवान रामेश्वर काकडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर दोन दिवसापासून उपचार सुरु होते. परंतु बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Rameshwar Kakade
Rameshwar Kakade

By

Published : Mar 17, 2022, 1:55 PM IST

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील जवान रामेश्वर काकडे ( Jawan Rameshwar Kakade ) यांना छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांसोबत दोन हात करताना वीरमरण आले आहे. ते दोन दिवसापूर्वी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ( The clash with the Naxalites ) जवान रामेश्वर काकडे हे गंभीर जखमी झाले होते. मात्र बुधवारी दुपारी रायपूर येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर उद्या चार वाजता गौडगाव येथे अंत्यविधी केला जाणार आहे.

गेल्या वर्षी झाला होता विवाह -

रामेश्वर काकडे यांचा विवाह गेल्या वर्षी झाला होता. त्यांना तीन महिन्याचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात वडील वैजनाथ काकडे आई व दोन बहिणी असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पुणे येथे रामेश्वर काकडे यांचे पार्थिव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या राहत्या गावी गौडगाव येथे त्यांच्यावर दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार ( Funeral around 4 p.m. ) केले जातील. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

2012 साली झाले होते भरती -

बार्शी तालुक्यातील गौडगाव हे रामेश्वर वैजनाथ काकडे यांचे मूळ गाव आहे. रामेश्वर काकडे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झाले. ते 2012 साली जम्मू काश्मीर येथे सैन्यात भरती झाले होते. दहा वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात विविध पदावर कार्यरत होते. मात्र सध्या ते छत्तीसगड येथील रायपूर या जिल्ह्यात कार्यरत ( Working in Raipur district ) होते. दोन दिवसाखाली झालेल्या रायपूर येथील नक्षलवाद्यांसोबत त्यांची चकमक उडाली होती. या चकमकीमध्ये जवान रामेश्वर काकडे हे गंभीर जखमी झाले होते. तसेच रायपूर येथे उपचार घेत असताना, बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या वडिलांना देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details