सोलापूर -आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज संस्थान शेगावचा पालखी सोहळा नऊ जिल्ह्यातून पायी प्रवास करत सोलापुरात दोन दिवस वास्तव्यास आला. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पालखी सोहळ्याला सोलापूरकर सेवेसाठी धावले. नाभिक समाज संघटनेतर्फे पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांना मोफत कटिंग-दाडी सेवा देण्यात आली. सोलापूरच्या कानाकोपऱ्यातुन भाविकांनी पालखीचे दर्शन ( Palkhi ceremony of shri sant Gajanan Maharaj ) घेत गजानन महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जयचा गजर केला.
Gajanan Maharaj Palkhi : वैष्णव जनांच्या सेवेसाठी धावले सोलापूरकर; वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग-दाडी - आषाढी वारी
सोलापुरातील नाभिक समाज संघटनेमार्फत श्री संत गजानन महाराज पालखीला विशेष सेवा देण्यात आली. बुलढाणा येथून पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग- दाडी सेवा देण्यात आली. जवळपास 700 वारकऱ्यांची कटिंग-दाडी करण्यात आली.
700 वारकऱ्यांसोबत दहा वाहने, तीन घोडे -रविवारी सकाळी गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात आगमन झाले. प्रभाकर महाराज मंदिरात काही वेळ थांबून कुचंन हायस्कुलच्या प्रांगणावर संतांचा मेळा विसावला. येथे विठू नामाचा गजर करून सोमवारी सकाळी 9 वाजता पालखी सोहळा सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात विसावला. पालखी सोबत असलेले 700 वारकरी, तीन घोडे, दहा वाहने देखील विसावले. शहरासह नजीकच्या गावातून हजारो भाविकांनी गजानन महाराज पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.
दोन दिवसांत 700 वारकऱ्यांची कटिंग-दाडी सेवा -सोलापुरातील नाभिक समाज संघटनेमार्फत श्री संत गजानन महाराज पालखीला विशेष सेवा देण्यात आली. बुलढाणा येथून पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग- दाडी सेवा देण्यात आली. जवळपास 700 वारकऱ्यांची कटिंग-दाडी करण्यात आली. तसेच वारकऱ्यांची कपडे, स्वच्छ धुऊन आणि इस्त्री करून देण्याचे कार्य नाभिक समाज आणि धोबी समाजाने केले.आणि ही सेवा दरवर्षी दिली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोरोना महामारीमुळे दोन वर्ष खंड पडला होता. यंदा मात्र नाभिक समाजाने मोठ्या आनंदाने ही सेवा दिली.