सोलापूर -काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की व अटक केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन भैय्या चौकात करण्यात आले. हाथरस सामूहिक अत्याचाऱ्यातील आरोपींना पाठिशी घालणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारचा व आणि मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
उत्तर प्रदेशात राहुल गांधींना धक्काबुक्की, सोलापुरात युवक काँग्रेसची निदर्शने - सोलापूर युथ काँग्रेस हाथरस निषेध आंदोलन
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्कीही झाली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र निषेध करत सोलापुरातील भैय्या चौक येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर गुरुवारी सायंकाळी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, दक्षिण सोलापुर विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, राहुल गोयल, सुभाष वाघमारे, यांच्यासह इतर उपस्थित होते.