महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2020, 8:24 AM IST

ETV Bharat / city

एस.टी कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री; ३ जुलैला धरणे आंदोलनाला बसणार

सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोलापूर येथील कामगार संघटनेचे नेते संतोष दोषी हे संघटनेच्या कार्यकर्त्या सोबत 3 जुलैला सोलापूर एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

st
एसटी संग्रहित

सोलापूर- कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी 23 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाले आणि लालपरीची चाकेही थांबली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. सध्या महाराष्ट्र राज्याची एसटी सेवा तोट्यात सुरू आहे. एस टी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे फक्त 50 टक्के वेतन मिळाले आहे. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन आहे. त्यात आणखीन 50 टक्क्यांची कात्री लावल्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोलापूर येथील कामगार संघटनेचे नेते संतोष दोषी हे संघटनेच्या कार्यकर्त्या सोबत 3 जुलैला सोलापूर एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

लॉकडाऊन नंतर एसटीची चाके धीम्या गतीने फिरू लागली आहेत. सोशल डिस्टंन्सिंगचेही पालन करावे लागत असल्यामुळे एका सीट वर एकच प्रवासी असे एकूण फक्त 22 प्रवाशी घेऊन एसटी धावत आहे. त्यामुळे डिझेल खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. तोट्यात असलेली एसटी आणखीन जास्त तोट्यात गेली आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. मार्च महिन्यात 75 टक्के वेतन, एप्रिल मध्ये 100 टक्के वेतन व मे महिन्यात 50 टक्के वेतन मिळाले आहे. एवढ्या कमी खर्चात घर कसे चालवायचे असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. निम्म्या वेतनात जगायचे कसे? असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. अनेक एसटी कर्मचारी घरात बसून काय करायचे असे विचार करून दुसरे काम शोधू लागले आहेत. संसाराचे गाडे चालवण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारीवर कामाला जात असल्याची व्यथा कामगार संघटनेचे नेते दोषी यांनी सांगितली. त्यामुळे कामगारांच्या पगारीची समस्या सोडविण्यासाठी धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर
आगारातून फक्त १० बस रस्त्यावर-

सोलापूर आगारातून फक्त 10 एसटी बसेस धावत आहेत. सोलापूर ते बार्शी, सोलापूर ते भांडरकवठा, सोलापूर ते अक्कलकोट. सोलापूर ते मंद्रुप. यामध्ये एकूण 15 ते 16 एसटी कर्मचारी काम करत आहेत. एसटी कडून उत्पनच नसल्याने विभागातील अधिकाऱ्यापासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच जण सध्या 50 टक्के वेतन घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details