सोलापूर- सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत 2 लाख 5 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 13 संशयीत जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 6 संशयीत जुगारी फरार झाले आहेत. ही कारवाई कुमठा नाका येथील क्रीडा संकुल बाजूला असलेल्या एका पत्रा शेड येथे केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू होता. या कारवाईत 33 हजार रुपयांची रोखड, दोन दुचाकी वाहने,10 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा 2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोलापूर : जुगार अड्ड्यावर कारवाई; 2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त - सोलापूर जुगार अड्ड्यावर कारवाई
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत 2 लाख 5 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार अड्ड्यावर धाड टाकून 13 संशयीत आरोपींना अटक केले
गुन्हे शाखेच्या पोलिसांना क्रीडा संकुल येथे एका पत्रा शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ताबडतोब याठिकाणी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत 13 जणांना अटक केले आहे. यामध्ये सोहेल अब्दुल शेख (वय 22 वर्ष, रा कुर्बान हुसेन नगर, सोलापूर), अमीरखान दावलखान पठाण (वय 28 वर्ष, कुर्बान हुसेन नगर, सोलापूर), राजू आनंद जाधव (वय 28 वर्ष, गैबीपिर नगर, लिमयेवाडी, सोलापूर), निजाम रियाजोद्दीन इनामदार (वय 36 वर्ष,रा शास्त्री नगर ,सोलापूर), अकिल अल्लाबक्ष बागवान (वय 40 वर्ष,रा. शास्त्री नगर,सोलापूर), एजाज आरिफ दंडु (वय 26 वर्ष, रा. कुर्बान हुसेन नगर,सोलापूर), शमशोद्दीन अल्लाउद्दीन काझी (वय 49,रा कुर्बान हुसेन नगर,सोलापूर), दीपक नागनाथ साळुंखे (वय 35 वर्ष,रा. बाळे,सोलापूर), बाळू दिलीप बोंबळेकर (वय 28 वर्ष, रा कुंभार गल्ली, लष्कर, सोलापूर), कयुम करीम हंजगीकर (वय 43 वर्ष, तोहीद मोहल्ला, शास्त्री नगर, सोलापूर), सय्यद करीम उर्फ वसीम इकबाल मोहोळकर (वय 34 वर्ष, शास्त्री नगर, सोलापूर), लक्ष्मण सिद्राम कमलापुरे (वय 38 वर्ष,कुमठा नाका ,सोलापूर) याना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सहा संशयीत आरोपीचा पोलीस तपास करत आहेत.फरार आरोपी मध्ये वसीम जहागीरदार, अन्वर शेख, नयूम पिरजादे, जमीर सय्यद, सादिक बागवान यांचा तपास सुरू आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या या पोलिसांनी केली-
गुन्हे शाखेचे एपीआय निखिल पवार, पोलीस नाईक संतोष फुटाणे, शितल शिवशरण, राकेश पाटील, संदीप जावळे, सचिन बाबर आदींनी ही धाड कारवाई केली आहे.