सोलापूर- शहरातील बांधकाम व्यवसायिक व मजुराला गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) रात्री अटक केली आहे.
खबऱ्याच्या माहितीवरुन पोलिसांनी लावला सापळा
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विशाल यलप्पा गायकवाड व बांधकाम व्यवसायिक महादेव शंकर चव्हाण यांच्याकडे गावठी पिस्तूल असून ते मध्य रेल्वेच्या सिनियर सेक्शन इंजिनिअर कार्यालयासमोर येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांना खबऱ्या दिली होती. माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सातरस्ता ते रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन इंजिनिअर कार्यालय, येथील सय्यद गॅरेज बोर्डच्या रोडलगतच्या फुटपाथजवळ सापळा लावला होता. त्यावेळी विशाल यलप्पा गायकवाड (वय 25 वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. 4, सोलापूर) व महादेव शंकर चव्हाण (वय 29 वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर) त्या ठिकाणी आले.
आधी दिली उडवा-उडवीची उत्तरे, झडतीत सापडली पिस्तूल