सोलापूर महामारीच्या 2 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर यंदाच्या वर्षी सोलापुरातील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची वर्दळ वाढली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातुन व तालुक्यातुन आलेले भाविक श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेत आहेत. सिद्धेश्ववर पंच कमिटीने सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीला फुलांनी सजविले आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीच्या संसर्गजन्य आजाराने श्रावण महिन्यात सिद्धेश्ववर मंदिरात Siddheshwar Temple Solapur जाण्यासाठी अनेक निर्बंध होते. यंदाच्या वर्षी सर्व राज्ये ही निर्बंध मुक्त झाल्याने भाविकांना मनसोक्त दर्शन घेण्यासाठी मंदिरे खुले झाले आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात सोलापुरातील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सोलापूर जिल्ह्यातील व कर्नाटक मधील विजयपूर, गुलबर्गा या जिल्ह्यातील सुद्धा भाविक दर्शनासाठी सोलापुरात येतात.
श्रावणी सोमवारी पहाटे पासून भाविक दाखल1 ऑगस्ट पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्ववर महाराज यांच्या मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पहाटे पासून काकडा आरती पासून सुरुवात झाली. यंदाच्या वर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेत आहेत. Siddheshwar Temple Solapur दर सोमवारी दिवसभर सोलापूर, विजापूर, गुलबर्गा, अक्कलकोट सह आदी भागातील नागरिकांची दर्शनासाठी गर्दी होते. दररोज सायंकाळी शिवयोगी सिद्धेश्ववर महाराजांच्या मंदिरात पालखी प्रदक्षिणा आणि रात्री 10 वाजता महाआरती करण्यात केली जात असल्याची माहिती मंदिराचे पुजारी हब्बू यांनी दिली आहे.