सोलापूर -भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांना पुराचा वेढा पडला होता. यातील पूरबाधीत गावांची सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
पूरबाधीतांचे पुनर्वसन करण्यास सरकार कटिबद्ध - सुभाष देशमुख - मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख news
दक्षिण सोलापूर मधील काही गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून अनेकांना तात्काळ भरपाई मिळाली आहे. जे बाकी आहेत, त्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मदत दिली जाईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
दक्षिण सोलापूर येथील वडापूर, कुसूर, खानापूर, तेलगाव, भंडारकवठे, बाळगी, सादेपूर, लवंगी, कारकल, औज (मं), कुरघोट, टाकळी या गावांची सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. गावातील स्थलांतरित नागरीकांची विचारपूस केली. खानापूर येथील ३५ कुटुंबाचे तसेच तेलंगावसह अन्य काही गावातील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करू, असे सांगून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांत अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.